Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार दहावी परीक्षेचा निकाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार दहावी परीक्षेचा निकाल या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल निकाल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स पुणे - रा...
आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार दहावी परीक्षेचा निकाल
या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल निकाल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पुणे -
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाने दिली. हे निकाल www.mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in या संकेतस्थळांवर पाहता येतील.
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top