Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वैशाली पाटील "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" च्या विजेत्या ठरल्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वैशाली पाटील "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" च्या विजेत्या ठरल्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स पुणे - श्रीकी फॅशन क्रिएशन्स आ...
  • वैशाली पाटील "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" च्या विजेत्या ठरल्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
पुणे -
श्रीकी फॅशन क्रिएशन्स आयोजित हुबळी येथे प्रथमच मिसेस युनिटी क्वीन ऑफ इंडिया सीझन २ चे आयोजन करण्यात आले होते. ८ मे रोजी डॉ वीरेंद्र कलाक्षेत्र सभागृह, हुबळी येथे आयोजित या भव्य यशस्वी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेत्या सौंदर्यवतीना थायलंड, मलेशिया आणि दुबई येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होत आहे. तसेच मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२ शीर्षक विजेती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 
या स्पर्धेत पुण्यातील वैशाली पाटील ह्या "मिसेस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल २०२२" विजेत्या ठरल्या आहेत. श्रीकी फॅशन क्रिएशन्स आयोजित श्रीकी फॅशन क्रिएशन्स चे सीईओ श्रीकांत शेटर, मोहम्मद नागमन सीईओ आयकॉनिक प्रॉडक्शन्स, भारताच्या मिसेस युनिटी क्वीनच्या आंतरराष्ट्रीय संचालिका रुजलिन डेव्हिड लॅनजॉब मलेशिया, एस्थर मोहंका कार्यकारी संचालक, शो डायरेक्टर ओम सत्पती, मिस्टर पेडले पीटर सीईओ आयकॉनिक प्रोडक्शन्स मलेशिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 
आपल्या या यशाबद्दल पाटिल म्हणाल्या, की मेहनत, सहनशक्ती आणि सातत्य यामुळेच हे यश मिळाले आहे. माझ्या यशाद्वारे इतरांना नवनिर्मिती करण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि प्रेरणा देण्याची इच्छा आहे. महिला सक्षमीकरण यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. या विजयानंतर मोठी जबाबदारी माझ्यावर आली अस हि पाटील म्हणाल्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top