Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: फसवणूक ; बनावट कागदपत्रे तयार करून पीक कर्जाची उचल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फसवणूक ; बनावट कागदपत्रे तयार करून पीक कर्जाची उचल बँकेला १३ लाखांनी गंडविले १४ जणांवर गुन्हा दाखल सहा जणांना अटक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर...
  • फसवणूक ; बनावट कागदपत्रे तयार करून पीक कर्जाची उचल
  • बँकेला १३ लाखांनी गंडविले
  • १४ जणांवर गुन्हा दाखल
  • सहा जणांना अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती -
जिवती तालुक्यातील पाटण येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून बनावट सातबारा व इतर कागदपञाचा वापर करून पीक कर्जाची उचल करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार पाटणच्या शाखा व्यवस्थापकाने उघडकिस आणले असून याप्रकरणात १४ जणांवर पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली असुन  इतर आठ जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मागिल वर्षी मे-जुनच्या दरम्यान १४ शेतकऱ्यांनी खरिप हंगामात बि-बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी पिक कर्जासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांना भारतीय स्टेट बँक शाखेच्या वतीने प्रत्येकी ९८ हजार रूपयाचे पिक कर्ज बँकेने मंजूर करून १३ लाख ७८ हजार रूपये बँकेने पिक कर्ज वाटप केले. पिक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपञाची महसुल विभागाकडून तपासणी केली असता सादर केलेले सातबारा, नमुना ८ अ, फेरफार पंजी, खोट्या सह्या व शिक्के मारल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बाब शाखा व्यवस्थापकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने पाटण पोलिसांनी १४ जणांवर गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक त्यांना २५ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून इतर आठ जणांना ताब्यात घेण्यासाठी पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक शहाजी घोडके तपास करित आहे.

बनावट सातबारा तयार करून देणारी टोळी सक्रिय
तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा पट्टा नसल्याने शासन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही याचाच फायदा घेत काही दलालांनी बनावट साताबारा, नमुना ८अ, फेरफार पंजी, तसेच बँकेचे निल दाखले सुध्दा खोटी सही, शिक्याने तयार करून शेतकऱ्यांना देतात यासाठी ते दहा ते पंधरा हजार रूपये घेतात हा प्रकार मागिल अनेक वर्षापासून बिनधास्तपणे सुरू आहे. सदर बनावट कागदपञाच्या आधारे शेतकरी बँकेतून कर्जाची उचल करित असल्याचा प्रकार मागिल अनेक वर्षापासून सुरू असून महसुल विभाग याकडे दुर्लक्ष का करते हा प्रश्न आहे.


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top