Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेल्वे संबंधी असणाऱ्या समस्या लवकर निकाली काढा - डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेल्वे संबंधी असणाऱ्या समस्या लवकर निकाली काढा - डॉ. मंगेश गुलवाडे भाजपा महानगर चंद्रपूरच्या वतीने रेल्वे महाप्रबंधक यांना निवेदन सादर आमचा ...
  • रेल्वे संबंधी असणाऱ्या समस्या लवकर निकाली काढा - डॉ. मंगेश गुलवाडे
  • भाजपा महानगर चंद्रपूरच्या वतीने रेल्वे महाप्रबंधक यांना निवेदन सादर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने मध्यरेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांना निवेदन सादर करण्यात आले ते यावेळी चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या पाहणीसाठी आले होते. पदाधिकऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात उडिया मोहल्ला, सावरकर नगर व जलनगर वासियांना दिलासा देण्यासंदर्भात तसेच बल्लारशाह येथून मुंबई करीता नवीन गाडी त्वरीत सुरु करणे व नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह येथून सुरु करणे, काजीपेठ पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस बल्लारशाह येथून सुरू करणे आणि बल्लारशाह येथे २४ डब्यांच्या पिटलाईनमुळे भविष्यात बल्लारशाह येथून थेट गाड्या सोडण्यासाठी कार्यक्रम आखणी करणे व चंद्रपूर ते चांदाफोर्ट लाईनचा सर्व्हे व तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामांना गती देणे इत्यादी समस्या रेल्वे महाप्रबंधक यांच्यापुढे मांडण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवडे यांनी महाप्रबंधक यांना चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वरील रेल्वे संदर्भात असणाऱ्या समस्या त्वरित सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. निवेदन सादर करतांना भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, डॉ. भुपेश भलमे, सुहास अलमस्त भाजपा महानगर सचिव राकेश बोमनवार, रामकुमार आकेपेलीवार, अमित निरंजने, मनीष खापरे, रमेश चिटलवार, शुभम बुटले, पंकज रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top