Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सुरक्षित जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलीस विभागाकडून १५ मे पासुन स्पेशल ड्राईव्ह सुरक्षित जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोली...
  • पोलीस विभागाकडून १५ मे पासुन स्पेशल ड्राईव्ह
  • सुरक्षित जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा
  • सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, आयुष नोपानी यांचे आवाहन
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
सध्याच्या काळात लोक कमी वेळेत जास्त काम करण्याकरीता तसेच वेळेची बचत करण्याकरीता कामावर जाण्याकरीता, शाळा, कॉलेज व ईतर कामाकरीता जाण्या येण्यासाठी अनेक साधनांचा वापर करीत आहे. सध्याची परिस्थीती पहाता वाहनांची संख्या जास्त असुन रोडचे रूंदिकरण पाहीजे त्या प्रमाणात झाले असल्याचे दिसुन येत नाही. अनेकवेळा युवक आपली दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर न करता किंवा ट्रीपल सिट बसवुन तसेच काही युवक चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट चा वापर न करता तसेच मद्य सेवन करून वाहन भरधाव वेगाने चालविल्यामुळे तसेच विरुध्द दिशेने वाहन चालविल्याने त्यांचा वाहनावरील नियंत्रण जावुन मोठा अपघात होवुन गंभीर दुखापतीमुळे मरण पावतात तर काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अनेक वेळा वाहन धारक आपल्या अल्पवयीन मुलांना ज्यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना नाहीत अश्याना सुद्धा वाहन चालविण्याकरीता देतात ते अल्पवयीन मुले हेल्मेटचा वापर न करता किंवा ट्रीपल सिट बसवुन वाहन भरधाव वेगाने चालविल्यामुळे त्यांचा वाहनावरील नियंत्रण जावुन मोठा अपघात होवुन गंभीर दुखापतीमुळे मरण पावतात तर काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने त्यांचे आई वडील अतिशय दुःखात जीवन व्यतीत करीत असतात.
स्पेशल ड्राईव्ह संबंधाने कारवाई विरुध्द वरील सर्व बांबींचे वाहन चालकांनी व पालकांनी पालन करणे आवश्यक आहे. परंतु वाहतुक नियमांचे नेहमीच उल्लंघन केल्या जात असल्याचे आपणा सर्वांनां दिसुन येत आहे. त्या करीता पोलीस विभागाकडून नांक १५ मे पासुन स्पेशल ड्राईव्ह सुरू करणार आहोत. त्यात आम्ही हेलमेट, सिट बेल्ट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, अल्पवयीन मुले वाहन चालवितांना मिळुन आल्यास त्याचे पालकावर प्रभावी कार्यवाही करणे, नंबर प्लेट, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणे तसेच क्षमते पेक्षा जास्त मालाची वाहतुक करणे, ताडपत्रीचा वापर न करणे, वाहनास रिप्लेक्टर, इंडिगेटर, स्टॉप लाईट नसने, जड वाहनात क्लीनरचा वापर न करणे, हॉयवे रोड वर विनाकारण इतरत्र वाहन थांबवुन वाहतुकीस अडथडा करणे ईत्यादी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाद्वारे कळविण्यात आले आहे. सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, आयुष नोपानी (भापोसे), पोलीस निरीक्षक वरोरा दिपक खोब्रागडे, पोलीस निरीक्षक भद्रावती गोपाल भारती यांचे कडून करण्यात आले आहे. 


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top