Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 17 मे ला राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
17 मे ला राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिवती येथील कोलाम गुड्यावर आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमात राहणार...
  • 17 मे ला राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
  • जिवती येथील कोलाम गुड्यावर आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमात राहणार उपस्थित
आमचा विदर्भ -ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 17 मे 2022 रोजी रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्याकडे प्रस्थान. रात्री 9:30 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्यावर आगमन व आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती, भोजन व मुक्काम.
बुधवार, दि. 18 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्यावर कोलामांशी समस्यांवर चर्चा. सकाळी 9 वाजता गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथुन चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 3:30 वाजता चंद्रपूर येथे कामगारांचा आनंद मेळावा. सायंकाळी 6:30 वाजता नागपूरकडे प्रयाण.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top