Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच लोकार्पण रत्नाकर चटप यांचे  उपोषण  ३१ मे पर्यंत स्थगित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिष्टाई धनराजसिंह...
  • नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच लोकार्पण
  • रत्नाकर चटप यांचे उपोषण ३१ मे पर्यंत स्थगित
  • मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिष्टाई
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
कोरपना -
कोरपना तालुक्यातील बहुप्रतिक्षित नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण व्हावे म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. नांदा ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. इमारत बांधकाम व पदभरती प्रक्रिया पूर्ण झालेली असूनही अद्याप लोकार्पण न झाल्याने नागरिकांत रोष आहे. रत्नाकर चटप यांनी आक्रमक भूमिका घेत आरोग्य मंत्री, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी आदींशी पत्रव्यवहार केला. मात्र ठोस पाऊले उचलली जात नसल्याने अखेर त्यांनी १७ मे पासून बेमुदत उपोषण करण्याचे ठरविले. अखेर प्रशासनाला जाग आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लवकरात लवकर आरोग्य केंद्र लोकार्पण केले जाईल असे लेखी दिले. मात्र लोकार्पणाची नेमकी तारीख कळल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार रत्नाकर चटप यांनी केला. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांचेशी अखिल भारतीय सरपंच परिषद महासचिव रत्नाकर चटप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांची बैठक पार पडली. या बैठकीत ३१ मे पर्यंत लोकार्पणाची नेमकी तारीख सांगितली जाईल व लवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरू केले जाईल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेट्टी यांनी दिली.
मंत्रालयीन स्तरावरील अधिकाऱ्यांशी वार्तालाप करून तातडीने लोकार्पण प्रस्ताव मंजूर करावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष वेधत ३१ मे पर्यंत उपोषण स्थगित करण्यास सांगितले. तूर्तास  उपोषणाला स्थगिती दिली आहे. प्रशासनाने दिलेले लेखी पत्र व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर त्यानंतर बेमुदत उपोषण केले जाईल असे रत्नाकर चटप यांनी सांगितले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top