Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बसदुरुस्ती करताना एसटी कर्मचाऱ्याचा चिरडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
file image बसदुरुस्ती करताना एसटी कर्मचाऱ्याचा चिरडून मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स मुल - गडचिरोली वरून चंद्रपूर कडे येणारी राज्य पर...
file image
  • बसदुरुस्ती करताना एसटी कर्मचाऱ्याचा चिरडून मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुल -
गडचिरोली वरून चंद्रपूर कडे येणारी राज्य परीवहन महामंडळाची चंद्रपूर आगाराची प्रवासी बस क्रं. एमएच १४ एचजी-८२४३ येथील बस स्थानकावरून चंद्रपूर कडे रवाना होण्यासाठी फलाटा वरून चालक रामचंद्र मेश्राम मागे घेत असताना प्रवेश व्दारावरील उतारावर अचानक ब्रेक नादुरूस्त झाले. प्रवासी बस समोर मागे करण्यास यांञीक दोष निर्माण झाल्याने नादुरूस्त बस मधील प्रवाश्यांना दुसऱ्या प्रवासी बसने चंद्रपूर कडे रवाना करून नादुरूस्त झालेल्या बसची तक्रार चंद्रपूर आगारात नोंदविण्यात आली.
नादुरूस्त बस दुरूस्त करण्यासाठी चंद्रपूर आगार येथुन राजु दांडेकर नामक यांञीकी कामगार मूल येथे आला. दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान नादुरूस्त बसची पाहणी करून अडकलेले ब्रेक दुरूस्त करण्यासाठी बस खाली झोपला. बस खाली झोपण्यापूर्वी संबंधित यांञीकी कामगार वा बस चालकाने बस मागे-पुढे जात अनुचित घटना घडू नये म्हणुन सुरक्षेचा उपाय म्हणुन नादुरूस्त बसच्या चाकासमोर दगड अथवा आडकाठी ठेवले नसल्याने दुरूस्त करीत असतांना अडकलेले ब्रेक अचानक मोकळे झाल्याने उभी बस क्षणात समोर आली त्यामूळे बस खाली झोपुन दुरूस्तीचे काम करणाऱ्या यांञीक कामगार राजु दांडेकर याचे अंगावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. लागलीच उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी जखमी राजु दांडेकर यांना येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून जखमी राजु दांडेकर यांना योग्य उपचारासाठी चंद्रपूरला हलवित असताना प्रवासा दरम्यान राजु दांडेकर याचा मृत्यु झाला. बस चालकाने चाकासमोर दगड ठेवले असते तर बस समोर आली नसती परीणामी यांञीकी कामगाराचा नाहक बळी गेला नसता, परंतु बस चालका कडून झालेल्या चुकीमूळे यांञीकी कामगारास जीव गमवावा लागल्याने बस चालक रामचंद्र मेश्राम विरूध्द भादंवी ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात मूल पोलीस करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top