Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फंट कान्व्हेंटच्या दहावीचा निकाल १०० टक्के
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इन्फंट कान्व्हेंटच्या दहावीचा निकाल १०० टक्के आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - शहरातील इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फ...
इन्फंट कान्व्हेंटच्या दहावीचा निकाल १०० टक्के
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शहरातील इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलच्या इयत्ता १० वी स्टेट शाखेचा सत्र २०२१-२०२२ चा निकाल १०० टक्के लागला असून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने १०० टक्के निकाल देण्याची परंपरा याही वर्षी या कान्व्हेंटने कायम ठेवली आहे. 
आज जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड इयत्ता १० वीच्या निकालात इन्फंट कान्व्हेंट ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी विनोद बोडेकर ८९ टक्के गुण घेऊन कान्व्हेंट मधून प्रथम आली आहे. पार्थ रविंद्र शेंडे ८८.६०  टक्के गुण घेऊन द्वितीय तर प्रणय श्रीनिवास आकनूरवार ८७.८० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. याशिवाय कु. कस्तुरी श्रीनिवास नामेवार ८६.८० टक्के, सलोनी खंडू आगलावे ८६.४० टक्के, धनश्री जितेंद्र धानोरकर ८५.६० टक्के, महेश्वरी गोवर्धन भानारकर ८५.६० टक्के, कु. गायत्री रविंद्र उकिनकर ८५.२० टक्के गुण घेऊन विशेष प्रावीण्य मिळविले आहे. एकूण ६८ पैकी  ३६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ३ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्यध्यापिका मंजूषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top