Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शासकीय गोदामात धान्य उपलब्ध होत नसल्याने धान्य वाटपात होत आहे विलंब
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शासकीय गोदामात धान्य उपलब्ध होत नसल्याने धान्य वाटपात होत आहे विलंब महिना लोटूनही धान्य मिळत नसल्याने कार्डधार संभ्रमात अविनाश रामटेके - आमच...
  • शासकीय गोदामात धान्य उपलब्ध होत नसल्याने धान्य वाटपात होत आहे विलंब
  • महिना लोटूनही धान्य मिळत नसल्याने कार्डधार संभ्रमात
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टेशन -
रोजंदारी काम करण्याऱ्या गरीब कुटुंबाना व सामान्य जनतेवर उपसमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने रेशनचे धान्य वितरण करीत आहे तसेच कोरोना संकटकाळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो मोफत धान्य वितरण प्रणाली अंतर्गत सुरू केल्याने गरिबांना याचा मोठा आधार झाल्याचे दिसून येत आहे, मात्र सध्या प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने गरिबांना ठरवून दिलेल्या महिन्यात धान्य मिळत नसल्याने गरीब लाभार्थी सरकारी धान्याच्या दुकानात चकरा मारताना दिसून येत असून कार्डधारक सरकारी धान्य दुकांदारावर बोंबाबोंब करीत असल्याचे चित्र दिसत आहे
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेतील व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्यात प्रति व्यक्ती क्रमशः दोन किलो तांदूळ व 3 किलो गहू तर अंत्योदय योजनेत 20 किलो तांदूळ व 15 किलो गहू व एक किलो साखर प्रति महीना दिली जाते. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पाच किलो मोफत रेशन गरीब जनतेला दिला जात आहे त्यामुळे या वर्गाला मोठा दिलासा मिळाला. 
राजुरा तालुक्यात एकूण 108 स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण केल्या जाते, धान्याची अफरातफर रोखण्यासाठी शासनाने दुकानपोच  साठी तीन मालवाहतूक गाड्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. एकीकडे निर्धारीत महिन्यात दोन दोन योजनेचे धान्य या मालवाहनाने पुरवठा करणे अवघड चालले आहे तर दुसरीकडे शासकीय गोदामात धान्य साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सरकारी स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचत नाही त्यामुळे कार्डधारक दुकानदाराला या अडचणी विषयी विचारून खाली हात घरी परत जात असताना दिसत आहे. 
आता मे महिना लोटत असला तरी एप्रिल महिन्यातील नियमित मिळणारे धान्य व गरीब कल्याण योजनेतील धान्य अजूनही मिळाले नसल्याने धान्य वितरण प्रणालीवर कार्डधारकांत शंका-कुशंका निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्डधारकात होत असलेली धांदल दूर करावी व महिन्यातील निर्धारित वेळेवर धान्य गरीब कष्टकरी जनतेपर्यंत मिळण्याची व्यवस्था सुधारावी अशी मागणी होत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top