Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर शेतकरी पुत्राने उभारला "सेंद्रिय खत प्रकल्प"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर शेतकरी पुत्राने उभारला "सेंद्रिय खत प्रकल्प" गोवरी येथील युवा शेतकरी दिनकर उरकुडे यांची यशोगाथा य...
  • जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर शेतकरी पुत्राने उभारला "सेंद्रिय खत प्रकल्प"
  • गोवरी येथील युवा शेतकरी दिनकर उरकुडे यांची यशोगाथा
  • युवकांनी स्वयंरोजगार करावा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शेती बेभरवशाची झाली आहे. उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. मात्र शेतीला जोड धंदा म्हणून आधार व्हावा यासाठी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी पुत्र दिनकर गिरिधर उरकुडे (३०) यांनी आपल्या खुल्या जागेवर सेंद्रिय खत प्रकल्प सुरू करून हक्काचा स्वयंरोजगार निर्माण केला आहे.
निसर्ग साथ देत नाही, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. शेतीवर खर्च करूनही अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतीला उतरती कळा आली आहे. आपल्या घरी शेती आहे.परंतु शेतीला पूरक जोडधंदा करावा, यासाठी गोवरी येथील दिनकर गिरिधर उरकुडे या उच्चशिक्षित शेतकरी पुत्राने आपल्या हक्काच्या खुल्या जागेवर "सेंद्रिय खत प्रकल्प" व्यवसाय सुरू केला आहे. माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील  उरकुडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद स्व निधी अंतर्गत शेतकरी पुत्राने हा सेंद्रिय प्रकल्प गोवरी येथे सुरू केला आहे.या व्यवसायासाठी दिनकर  उरकुडे यांचे सोबत त्यांचा लहान भाऊ गोपाल हा सुद्धा या व्यवसायासाठी भावाला मदत करीत आहे. जिद्द चिकाटी, मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट सध्या करता येते असे त्यांनी सांगितले. 
कुठेही नोकरीसाठी शोधाशोध न करता स्वतःच त्यांनी  स्वयंरोजगार निर्माण केला आहे. त्यामुळे हा सेंद्रिय खत प्रकल्प व्यवसाय करणाऱ्या होतकरू युवकांसाठी नक्कीच नवसंजीवनी  ठरणारा आहे. शेती बेभरवशाची झाल्याने युवकांनी शेतीला जोड धंदा म्हणून विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केल्यास स्वयंरोजगार निर्माण करता येईल.त्यामुळे युवकांनी विविध व्यवसायाकडे वळावे असेही दिनकर ऊरकुडे यांनी सांगितले.
निसर्ग साथ देत नाही. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतीला उतरती कळा आली आहे. दिवसेंदिवस बेरोजगारीची बिकट समस्या आजच्या युवकांसमोर उभी आहे. प्रत्येक युवकांनी स्वयंरोजगार निर्माण केल्यास बेरोजगारीची समस्या दूर होईल. युवकांनी विविध व्यवसाय सुरू केल्यास स्वयंरोजगाराला नवी चालना मिळेल.
दिनकर गिरिधर  उरकुडे
युवा सेंद्रिय खत प्रकल्प निर्मिती, संचालक, गोवरी

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top