Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आयपीएल : सात सट्टा बुकींना पोलिसांनी केली अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयपीएल : सात सट्टा बुकींना पोलिसांनी केली अटक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घूस - स्थानिक केमिकल वॉर्ड क्र. 6 येथे भ्रमनध्वनी वरून आयपी...
  • आयपीएल : सात सट्टा बुकींना पोलिसांनी केली अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घूस -
स्थानिक केमिकल वॉर्ड क्र. 6 येथे भ्रमनध्वनी वरून आयपीएल सट्टा घेत असल्याची गोपनीय माहिती वरोरा येथील पोलिसांना दिली असता वरोरा पोलिसांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली केमिकल क्र. 6 येथे रोहित पृथ्वीराज घोरपडे यांचे घरी रात्री 12.30 ते 2 वाजताच्या दरम्यान धाड टाकून आरोपी जमीर खान उर्फ जम्मू मेहबूब वय 38 वर्ष, मोहंमद शेफ शब्बीर चिनी वय 25वर्ष, निलेश अरोरा वय 46 वर्ष, मनीष डफ वय 44 वर्ष, मोहम्मद आसिम मोहम्मद अनिस वय 19 वर्ष, एजाज अल्ली ताहेर अल्ली सर्व रा. वणी जि. यवतमाळ व रोहित घोरपडे वय 26 वर्ष रा. घुग्घूस या आरोपीना 1 लाख 20 हजाराच्या मुद्देमाला सह कलम 420, 465, 468, 471(34) महाराष्ट्र जुगार कायदा 4,5 अन्वये घुग्घूस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार बबन पुसाटे करीत आहे.

आमचा विदर्भ न्यूज पोर्टलला फॉलोव करा.....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top