Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नदीपात्रात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नदीपात्रात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील रुपेश विलास सहारे वय 25...
  • नदीपात्रात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील रुपेश विलास सहारे वय 25 वर्ष हा युवक दिनांक 15 मे 2022 ला कामावर जातो म्हणून घरून निघून गेला सायंकाळ झाली तरी रुपेश घरी आला नाही म्हणून शोधाशोध करून तो मिळाला नसल्याने फिर्यादी त्यांचे वडील विलास मोतीराम सहारे यांनी दिनांक 17 मे ला सावली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीमध्ये 15 मे ला मला भेटण्यासाठी कोणीतरी येत आहे व मी गडचिरोली येथे जातो असे सांगून रुपेश घरून गेला त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याने क्रांती बार येथे सायकल ठेवली त्यानंतर तो दोन दिवस घरी न आल्याने शोधाशोध केली परंतु त्याचा शोध लागला नाही अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी मिसिंग केस दाखल करून शोध घेतला असता दि. 20 मे ला दुपारच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रातील वाघोली उपसा जलसिंचन योजने जवळ कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली असता सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दर्शन लाटकर व श्रीकांत वाढई हे घटनास्थळी जाऊन प्रेत बाहेर काढले व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घटनास्थळी  पंचनामा केला पुढील तपास सावली पोलिस करीत आहे.

आमचा विदर्भ न्यूज पोर्टलला फॉलोव करा.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top