Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भस्मसात ; चालत्या दुचाकीने घेतला पेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भस्मसात ; चालत्या दुचाकीने घेतला पेट आगीत दुचाकी जळून खाक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील खेडी गाव...
  • भस्मसात ; चालत्या दुचाकीने घेतला पेट
  • आगीत दुचाकी जळून खाक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील खेडी गावाजवळ चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली. सावली तालुक्यातील किसान नगर येथील रमेश तुळसिदास हे एमएच. 34 बीके 6640 या दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीने अचानक पेट घेतला असता त्यांनी वाहनावरून उडी मारून आपला जीव वाचवीला. मात्र हवा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि क्षणार्धात दुचाकी जळून खाक झाली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व दुचाकीला लागलेली आग विझविण्यात आली. पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.

आमचा विदर्भ न्यूज पोर्टलला फॉलोव करा.....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top