Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "त्या" अपघातातील मृतकांच्या कुटुबींयाना पाच लक्ष रुपयांची मदत जाहिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"त्या" अपघातातील मृतकांच्या कुटुबींयाना पाच लक्ष रुपयांची मदत जाहिर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मिळणार मदत आमदार किशोर जोरगेवार य...
  • "त्या" अपघातातील मृतकांच्या कुटुबींयाना पाच लक्ष रुपयांची मदत जाहिर
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मिळणार मदत
  • आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती मुख्यमंत्रींना मदतीची मागणी
चंद्रपूर -
मुल मार्गावरील अजयपूर येथे झालेल्या अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटुन केली होती. यावेळी मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. यावर 12 तासाच्या आत मुख्यमंत्री यांनी निर्णय घेत मृतकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन पाच लक्ष रुपयांची मदत जाहिर केली आहे.
गुरुवार रात्रोच्या सुमारास लाकडणाने भरलेला ट्रकची डिझेल टँकरशी समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही वाहणांनी पेट घेतला हि आग इतकी भीषण होती की यात ट्रक मधील सहा कामगार, वाहणचालक आणि डिझेल टँकर  मधील वाहण चालक व मजूर यांचा जळुन मृत्यु झाला होता. घरचा कर्ता गमावल्याने सदर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले होते. त्यामूळे सदर कुटंबांचा सहानभुती पुर्वक विचार करुन त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुबंई येथील वर्षा निवासस्थावर भेट घेउन केली होती. या मागणीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 12 तासाच्या आत दखल घेत सदर मृतक कुटुंबियांना 5 लक्ष रुपयांची मदत जाहिर केली आहे. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहे. विषेश म्हणजे आजच आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक कामगारांच्या स्वगावी लावारी येथे जाउन कुटुंबीयांची भेट घेतली होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top