Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वर्धा नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घुस - येथून तीन किमी अनंतरावर असलेल्या नकोडा येथील पाणी ...
  • वर्धा नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घुस -
येथून तीन किमी अनंतरावर असलेल्या नकोडा येथील पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळ वर्धा नदीच्या पात्रात एका अज्ञात इसमचा मृतदेह तरंगतांना आज दिनांक 16 मे ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान आढळून आला.
ही माहिती नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर व महादेव मेश्राम यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळविण्यात आले असता उपपोलीस निरीक्षक नीलम डोंगरे, मंगेश निरंजने, सुनील इरमुलवार यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मर्ग दाखल करून मृतदेह शव विच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला.पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top