Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रात्रभर सुरु होते आग विझविण्याचे कार्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रात्रभर सुरु होते आग विझविण्याचे कार्य आज दुपारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन यंत्रणेला यश पेपर मिल बांबू डेपोला लागलेल्या भीषण आग कोट...
  • रात्रभर सुरु होते आग विझविण्याचे कार्य
  • आज दुपारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन यंत्रणेला यश
  • पेपर मिल बांबू डेपोला लागलेल्या भीषण आग कोट्यवधी रुपयांचे बांबू व मालमत्ता जळून खाक 
  • कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
जागतिक दर्जाचे पेपर उत्पादन करणाऱ्या बल्लारपूर पेपर मिलच्या बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिलचा बांबू, निलगिरी व सोप बाबूलचा  कच्च्या माल साठविण्याचा डेपो बल्लारपूर-आल्लापल्ली महामार्गावर शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या कळमना गावाजवळ आहे या डेपोत साठविलेला कच्चा माल पेपर मिल ला पाठविण्यात येतो. रविवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान या डेपोला भीषण आग लागली होती. या आगीत आगारातील संपूर्ण साठवणूक केलेल्या बांबू व लाकूड जळून खाक झाला. जिल्हा व आसपासच्या अग्निशमन दलाच्या 24 हून अधिक पथकांच्या गाड्यांनी 300 हुन अधिक फेऱ्या मारत आज सोमवारी दि. २३ मे ला दुपारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन यंत्रणेला यश मिळाले. रात्रभर निरंतर आग विझविण्याचे कार्य सुरूच होते. आग इतकी भीषण होती की जवळपास 11 एकरावर पसरलेल्या हा लाकूड डेपो जळून खाक झाला. 
रविवारी लागलेली आग सोमवारी दुपारी 12 वाजताच्या जवळपास नियंत्रणात आली. मात्र आग धूमश्यात असून आगीची झळ कळमना येथील गावकऱ्यांना बसू नये म्हणून तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, वन विभाग प्रशासन लक्ष ठेऊन होते. तहसीलदार संजय राईंचवार कळमना येथे तळ ठोकून होते. सोमवारी रात्री पर्यंत संपूर्ण आग आटोक्यात येईल असे सूत्रांकडून सांगितल्या जात आहे. 
बल्लारपुर पेपर उद्योगाला लागणारा कच्चा माल आगीत भस्मसात झाला. याचा परिणाम येणाऱ्या काळात उत्पादनावर होणार आहे. सदर कच्चा माल पावसाळ्यात कामी येणार होता. या आगीत जीव हानी झाली नाही, मात्र प्रचंड वित्त हानी झाली, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हे तपासा नंतर निष्पन्न होणार आहे. आगीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत तारा जळून खाक झाल्याने आजूबाजूच्या गावात बत्ती गुल झाली होती. 
पेट्रोल पंप आगीच्या भक्षस्थानी कळमना बांबू डेपो जवळ चंद्रपूर येथील व्यवसायिक महेंद्र फुलझेले यांचा भारत पेट्रोल पंप होता. बांबू आगारातील आगीने हा पेट्रोल पंप कवेत घेतला. मात्र पेट्रोल पंपाचा स्फोट झाला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल 1300 लिटर तर डिंडोल 1550 लिटर साठा होता. पेट्रोल पंपाचा सफोट झाला नाही, असे तहसीलदार संजय राईचवार यांनी सांगितले. मात्र पेट्रोल पंप चालकाचे भीषण आगीमुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
कळमना पेपरमिल डेपोला लागलेल्या आगीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल
घटनास्थळी भेट देत उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले निर्देश 
दरम्यान माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना सदर  घटनेची माहिती कळविली व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्याची विनंती केली. तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना ताबडतोब आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. पोलीस अधीक्षकांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार बल्लारपूर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे येथील फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाच्या किट्स वितरण आणि प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, तहसीलदार संजय राईंचवार, पोलीस निरीक्षक उमेश पाटील आदींची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top