Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पेपर मिल बांबू डेपोला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचा बांबू-निलगरी जळून खाक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पेपर मिल बांबू डेपोला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचा बांबू-निलगरी जळून खाक घटनास्थळी राजुरा, चंद्रपूर, गडचांदूर, नारंडा, मूल येथील पा...
  • पेपर मिल बांबू डेपोला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचा बांबू-निलगरी जळून खाक
  • घटनास्थळी राजुरा, चंद्रपूर, गडचांदूर, नारंडा, मूल येथील पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या
  • बल्लारपूर-कोठारी महामार्गावरील वाहतूक बाधित
  • बघा व्हिडीओ - वाचा सविस्तर..... 
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
जिल्ह्यात सतत आगीच्या घटनेत वाढ होत असतांना आज दुपारच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील कोठारी मार्गावरील बल्लारपूर पेपर मिलचा बांबू डेपोला भीषण आग लागली. बांबू असल्यामुळे आगीने लवकरच रुद्र रूप धारण केले. तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. बल्लारपूर पेपर मिल प्रशासन, बल्लापूर नगर परिषद, राजुरा नगर परिषद येथील अग्निशमन वाहन पोहचले असून अग्निशमन दला द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणाहून पेट्रोल पंप जवळ असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. 
NEWS UPDATE 
पेपर मिल बांबू डेपोला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे बांबू व निलगरी जळून खाक
कळमना येथील पेपर मिल डेपोला रविवार दि. २२ मे ला दुपारी २ वाजताचा दरम्यान लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे बांबू व निलगरी जळून खाक झाल्याचा प्रकार घडला. आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही. डेपोच्या जवळच पेट्रोपंप असून त्याची झळ पेट्रोल पंपा पर्यंत पोहोचणार नाही यासाठी प्रशासनाद्वारे शर्थीने प्रयत्न करण्यात येत होते.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बल्लारपूर पेपरमिलचा बांबू, निलगिरी व सोप बाबूल कच्च्या माल साठविण्याचा डेपो बल्लारपूर-आल्लापल्ली महामार्गावर आहे. या डेपोतून साठविलेला कच्चा माल पेपर मिल ला पाठविण्यात येतो. रविवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. यात कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जळला असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
डेपोला आग लागताच बल्लारपूर पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन दलाचे पथक घटना स्थळावर दाखल झाले असून बातमी प्रकाशित होई पर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. हवा जोराची असल्याने आग पसरत गेली व संपूर्ण डेपो आगीच्या विळख्यात सापडला. त्यानंतर अधीकच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. राजुरा, चंद्रपूर, गडचांदूर, नारंडा, मूल येथून पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र या आगीत सदर लाकूड डेपो पूर्णतः जळून खाक झाल्या असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. 
बल्लारपूर वन परिक्षेत्रातील लावारी कळमना बीटातील जंगलात सकाळ पासून वणवा भडकला होता. जंगल जळत जळत डेपो पर्यंत आला असावा व त्याची धग डेपो पर्यंत पोहचली असावी व त्यामुळे डेपोला आग लागली असावी असा तर्कवितर्क करण्यात येत आहे. घटना स्थळावर बल्लारपूर पोलीस, पेपर मिलचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. वृत्त प्रकाशित होई पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नव्हते. 
बल्लारपूर-कोठारी महामार्गावर डेपो असल्याने व आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या भयंकर भीषण झळाचे लोट उसळत होते. धुरांचे लोट निघत असल्याने संपूर्ण परिसर धुराने झाकला असल्याने महामार्गावरील रहदारी थांबविण्यात आली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top