Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपुरात बांबू डेपोला लागली भीषण आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुरात बांबू डेपोला लागली भीषण आग बघा व्हिडीओ  एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - जिल्ह्यात  सतत आगीच्या घटनेत वा...
  • बल्लारपुरात बांबू डेपोला लागली भीषण आग
  • बघा व्हिडीओ 
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
जिल्ह्यात सतत आगीच्या घटनेत वाढ होत असतांना आज दुपारच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील कोठारी मार्गावरील बल्लारपूर पेपर मिलचा बांबू डेपोला भीषण आग लागली. बांबू असल्यामुळे आगीने लवकरच रुद्र रूप धारण केले. तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. बल्लापूर पेपर मिल प्रशासन, बल्लापूर नगर परिषद, राजुरा नगर परिषद येथील अग्निशमन वाहन पोहचले असून अग्निशमन दला द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणाहून पेट्रोल पंप जवळ असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top