Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूर जिल्हा हिन्दी मराठी पत्रकार संघाचे संघटक पदी रफिक शेख यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्हा हिन्दी मराठी पत्रकार संघाचे संघटक पदी रफिक शेख यांची निवड धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - गडचांदूर येथील द...
  • चंद्रपूर जिल्हा हिन्दी मराठी पत्रकार संघाचे संघटक पदी रफिक शेख यांची निवड
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
गडचांदूर येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी मोहंमद रफिक शेख यांची सर्वानुमते महाराष्ट्र हिंदी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष धनश्री काटीकर पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन चंद्रपूर जिल्याच्या संघटकपदी निवड केली. या आधी मो.रफिक शेख मागील वीस, पंचविस वर्षा पासून पत्रकारी क्षेत्रात कार्य करीत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई चे कोरपना तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोरपना चे तालुका अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा कमेटीत सदस्य म्हणून कार्य केले असून हिन्दी मराठी पत्रकारसंघाचे प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर यांनी त्यांची निवड केली. प्रा. आकनुरवार, प्रा. बेलोरकर, प्रा. अशोक डोइफोडे, लुकमान बक्ष, शरद जोगी, गौतम धोटे, प्रवीण मेश्राम, मंगेश तिखट व इतर मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top