- उपजिल्हा रुग्णालयात 34 रक्तदात्यांचे रक्तदान
- अधिक्षक लहू कुळमेथे यांनी रक्तदान करून केले शिबिराचे उद्घाटन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
सध्या जिल्ह्यात रक्ताची कमतरता असून जिल्ह्यात रुग्णांच्या रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आज दिनांक 23 मे ला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे यांनी फित कापून आणि रक्तदान करून केले. उन्हाळा असतानाही 34 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. अशोक जाधव, डॉ. अनिता आरके - कुळमेथे, डॉ. इर्शाद शेख उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या या रक्तदान शिबिरात रुग्णालयाचे कर्मचारी आणि नागरिक यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांत डॉ. यादव, किशोर रामटेके, साक्षी झंवर, वर्षा झंवर, पंकज झंवर, हिवराज नेवारे, रामचंद्र पवार, सोने, कांबळी, पंढरी आकनुरवार, योगेश चहारे, सुनील चाफले, मधुकर बोबडे, संजय तूडकेल, संतोष मादसवार, राजकुमार आकापाका यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील आणि राजुरा येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ शुभम कांबळे, चंद्रकांत नेवलकर, रुपेश डहाळे, रश्मी बोरकर, पल्लवी पवार, शुभांगी पुरटकर यांनी रक्तदान शिबिरात मोलाचे सहकार्य केले.
Advertisement

Related Posts
- Black Diamond Pre School - Grandparents Day14 Sep 20250
"तुमच्यामुळे आम्ही आज इथे आहो" – भावस्पर्शी क्षणब्लॅक डायमंड प्री स्कूलमध्ये आजी-आजोबा दिवस उत्साहात...Read more »
- राजुरा सेवा पंधरवडा – लोकाभिमुख शासनाची वाटचाल13 Sep 20250
सेवा पंधरवाड्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजनआमचा विदर्भ - अनंता गोखरेराजुरा (दि. १३ सप्टे...Read more »
- राजुराचा अभिमान – सात मान्यवरांना राजुरा भूषण सन्मान13 Sep 20251
इतिहास आणि आधुनिकतेचा संगम – राजुरा मुक्तिदिन सोहळाराजुरात 17 सप्टेंबरला मुक्तिदिन निमित्य गौरवाचा स...Read more »
- “हिरवाईसाठी होमगार्डांचा हिरवा संकल्प”12 Sep 20250
राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत वृक्षारोपणाचा उत्साहआमचा विदर्भ - अनंता गोखरेराजुरा (दि. १२ सप्टेंबर २०२५...Read more »
- मच्छी तलावात बुडून इसमाचा दुर्दैवी अंत – गावात शोककळा10 Sep 20250
धानोऱ्यातील दुर्घटना – कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगरआमचा विदर्भ - प्रवीण चिडेविरुर स्टे. / राजुरा (...Read more »
- १० वर्षांची सेवा वाया? कर्मचाऱ्यांची ‘नियमितीकरणा’साठी गर्जना10 Sep 20250
आरोग्य कर्मचाऱ्यांचा संताप उसळला – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनआमचा विदर्भ - दीपक शर्माचं...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.