Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपना तालुक्यात चोर बीटी बियाणे जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यात चोर बीटी बियाणे जप्त जिप कृषी विभागाची कारवाई ; कारवाईत 18 पॉकेट जप्त मोठा चोर हाती लागणार की नाही हा मोठा प्रश्न? धनराजसिं...
  • कोरपना तालुक्यात चोर बीटी बियाणे जप्त
  • जिप कृषी विभागाची कारवाई ; कारवाईत 18 पॉकेट जप्त
  • मोठा चोर हाती लागणार की नाही हा मोठा प्रश्न?
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
आज दि. 23 मे 22 रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहीतीच्या आधारे कोरपना तालुक्यात निर्बंध असलेली HTBT बियाण विक्री होत असल्याची माहीती मिळाली. त्या आधरावर मौजा राजुरगुडा, ग्रापं नांदा येथील एका शेतकऱ्याच्या घरी भेट दिली असता त्यांच्या घरातील पहिल्या माळ्यावरील खेलीत एका पिवळ्या रंगाच्या पोत्यात 18 पॉकीटे HTBT कापूस बियाणे आढळून आले. जिल्हा कृषी विभागाच्या विशेष पथकाने जप्तीची कार्यवाही करून पंचनामा करण्यात आला. जप्त झालेल्या बियांनात HARSHA 555 BG ।। 7 पाकिट, R=659 -BG ।।। 9 पाकिट, शकील गोल्ड 2  पॉकीटे अशी एकूण 18 कापूस बियाण पाकीट मिळाले.
वरील सर्व पाकिटावर MRP,  Lot no., Batch no. Date of expiry, Date of valildity चा  काहीच उल्लेख नसल्याने सर्व 18 पाकीट जब्त करून पंचायत समिती कार्यालय कोरपना येथे जमा करण्यात आले आहे. सदर कार्यवाही जिप कृषि विकास अधिकारी लक्ष्मी नारायण दोड़के, पंस कोरपना कृषि विकास अधिकारी विवेक दुधे, जिप ग्राविअ मकरंद लिंगे, वि.अ. (कृषी) नितिन ढवस व विनोद गाडगे यांनी केली. कृषी विभागाने बळीराजा वर कारवाई करण्यापेक्षा शेतकऱ्यांना निर्बंधित बियाण्याचा पुरवठ्या करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांचा मुसक्या आवळाव्या अशी चर्चा परिसरात सुरु आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top