Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ताडोबाची शान "वाघडोह" वाघाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ताडोबाची शान "वाघडोह" वाघाचा मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपुर - ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय "...
  • ताडोबाची शान "वाघडोह" वाघाचा मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपुर -
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय "वाघडोह" वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हा वाघ ताडोबातील वाघडोह भागात दीर्घकाळ राहिल्याने त्याला "वाघडोह मेल" हे नाव पडले. 
कधीकाळी ताडोबात "वाघडोह" वाघाचा दरारा होता, मात्र कालांतराने वृध्दावस्थेमुळे त्याचे वर्चस्व कमी होत गेले व इतर वाघांनी त्याला हुसकावून लावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रानजीक असलेल्या जंगलात भटकत होता. काही दिवसापूर्वी "वाघडोह" चे जर्जर अवस्थेतील फोटो व्हायरल झाले होते. वय वाढल्यामुळे त्याला शिकार करणे अवघड झाले होते. त्याची प्रकुर्तीही ठीक नव्हती. अश्यातच आज सिनाळा जंगलात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या वयोवृद्ध वाघाचे वय १७ वर्षे होते. एवढा काळ जगलेला १७ वर्षे वयाचा हा राज्यातील एकमेव वाघ असल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top