Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रेम प्रकरणातून मुलाने मुलीवर केला चाकूने हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रेम प्रकरणातून मुलाने मुलीवर केला चाकूने हल्ला स्वतःवरही केले चाकूने वार ; परिसरात उडाली खळबळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ माणिकगड किल्ल्यांवरील घ...
  • प्रेम प्रकरणातून मुलाने मुलीवर केला चाकूने हल्ला
  • स्वतःवरही केले चाकूने वार ; परिसरात उडाली खळबळ
  • प्रसिद्ध पर्यटन स्थळ माणिकगड किल्ल्यांवरील घटना
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
प्रेम प्रकरणातून गडचांदुर येथील एका मुलाने आपल्या प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला व नंतर स्वतःच्या हातावर चाकूने वार करून जीव देण्याचा प्रयत्न केला, जिवती पोलिस हद्दीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माणिकगड किल्ल्यावर ही घटना घडल्याने गडचांदुर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि. 23 मे ला दुपारला सुमारे एक वाजताच्या सुमारास गडचांदुर येथील रहिवासी एका 21 वर्षीय इसमाने प्रेयसीला सोबत घेऊन माणिकगड किल्यावर आला होता. इसमाने आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. पण प्रेयसी मुलीने प्रियकराला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रेयसी मुलीच्या नकाराने संतापलेल्या प्रियकराने ने रागाच्या भरात अचानक मुलीच्या गळ्यावर सोबत आणलेल्या चाकुने वार करून स्वतःच्या हातावर ही चाकूने वार करून जीव देण्याच्या प्रयत्न केला. किल्ल्यावर फिरायला आलेल्या अन्य काही पर्यटकांनी रक्ताने माखलेल्या युवक-युवतीला बघताच त्यांनी तेथील काही वान मजुरांना बोलावून त्यांच्या साहाय्याने दोघानाही किल्ल्यावरून खाली उतरले आणि जिवती पोलिसांना घटनेची माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच जिवती पोलिसांनी घटनस्थळी पोहचून जखमी अवस्थेत दोघानाही गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व नंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णलयात पाठवण्यात आले. सध्या दोघांची प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती मिळाली आहे. जिवती पोलिसांनी प्रियकर आरोपी विरुद्ध भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि जगताप करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top