- जिल्ह्यात अग्नितांडव सुरूच....
- चंद्रपुरात कापड दुकानाला लागली भीषण आग
- आगीत दोन्ही मजले जळून खाक
- लाखों रुपयांचे कपडे भस्मसात
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
येथील वर्दळीच्या व शहरात जाणाऱ्या कस्तुरबा मार्गावर युब कलेक्शन या रेडिमेड कपड्याच्या दुकानाला मध्यरात्री लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार युब कलेक्शन चे दोन्ही मजले जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सदर दुकान रात्री 10.30 वाजता बंद करून कर्मचारी आपापल्या घरी गेले. दरम्यान नेमक्या कालच्याच दिवशी दुकान मालक बाहेरगावी गेले होते हे विशेष. दुकान बंद केल्याच्या अवघ्या तासाभरातच दुकानाला आग लागली. दुकानाचे सर्व दरवाजे बंद असल्याने लागलेली आग आतल्या आत धुमसत होती. दुकानात कापड व वेष्टणांसाठी प्लास्टिक वापरण्यात येत असल्याने काही वेळातच ही आग वरच्या मजल्यावर पोहचली व तिथेही आगीने थैमान घातले. आग लागल्याचे कळताच दुकानदार तत्काळ घटनास्थळी आले तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले हप्ते. अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्याची मोहीम सुरु केली, पहाटे पर्यंत आग नियंत्रणात आली. या आगीने दुकानमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.