Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भरधाव ट्रकने बैलांना दिली धडक ; दोन बैल गंभीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भरधाव ट्रकने बैलांना दिली धडक ; दोन बैल गंभीर  जखमी  एकाच दिवशी राजुरा-गोवरी मार्गावर दोन घटना संतप्त नागरिकांचा पाच तास चक्काजाम ओव्हरलोड व...
  • भरधाव ट्रकने बैलांना दिली धडक ; दोन बैल गंभीर जखमी 
  • एकाच दिवशी राजुरा-गोवरी मार्गावर दोन घटना
  • संतप्त नागरिकांचा पाच तास चक्काजाम
  • ओव्हरलोड वाहतूक व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्यांचा गावकऱ्यांचा आरोप
  • शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या मध्यस्थीने बैल मालकाला 40 हजार रुपयाची मदत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा गोवरी मार्गावर दि. 14 मे रोजी सकाळच्या सुमारास गोवरी व रामपुर जवळ कोळसा वाहून येणाऱ्या भरधाव ट्रकने बैलांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याच्या दोन घटना घडल्या. यात गोवरी येथील संतप्त नागरिकांनी पाच तास चक्का जाम आंदोलन केले. शेतकऱ्यांना आर्थिक रोख मदत मिळाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. ओव्हरलोड वाहतूक व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
भर उन्हात पाच तास चक्काजाम करत असताना संतप्त नागरिक
दिनांक 14 मे रोजी सकाळी गोवरी येथील आबाजी पाटील पिंपळकर यांचा शेतगडी बैलबंडी घेऊन शेताकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने बैलबंडी ला धडक दिली. यात बैलबंडी झाडाला जाऊन धडकली. ट्रकच्या धडकेने बैल गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर ट्रकचालकाने पळ काढला. नागरिकाने त्या वाहनाचा पाठलाग केला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी जमा झाले व सकाळी सात वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. गावातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत. शेतीच्या हंगामातच बैलाला बैलजोडीला धडक दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण झाला. त्यानंतर आर्थिक मदत मिळेपर्यंत गावकर्‍याने चक्काजाम आंदोलन केले. गावकरी व ट्रान्सपोर्ट मालक मध्यस्थीनंतर आबाजी पिंपळकर यांना ट्रान्सपोर्ट मालकाने पंचेचाळीस हजाराची रोख मदत केली. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. 
बबनभाऊ उरकुडे यांच्या मध्यस्थीने मदत स्वीकारताना बैल मालक
दुसरी घटना रामपूर येथे घडली. गोवरी येथील शेतकरी सुधाकर परसूतकर यांनी आपला बैल शनिवार बाजार राजुरा येथे विक्रीकरिता आणत असताना रामपूर जवळ जे.के. ट्रान्सपोर्टच्या ट्रक ने जोरदार धडक दिली. या घटनेत बैल बेकामी झाले असून पूर्णपणे अपंग झालेला आहे.
जडवाहतुकीसाठी हा रस्ता नसून सुद्धा या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघात वाढत चालले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि ट्रान्सपोर्ट मालकाशी संपर्क करून पीडित शेतकऱ्याला 40 हजार रुपयाची रोख मदत मिळवून दिली. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, विनोद परसूटकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
राजुरा गोवरी मार्गाचे काम अतिशय थंड बस्त्यात सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था आहे. कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. या भागातील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अहोरात्र ओवरलोड कोळसा वाहतूक या मार्गावर सुरू आहे. प्रचंड वेगाने ही वाहने धावतात. अनेक वाहन चालक प्रशिक्षित नाहीत. परवानाधारक काही नाहीत अनेक वाहनांना रिफ्लेक्टर, इंडिकेटर नाहीत. परिवहन व पोलीस विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. अशा स्थितीमध्ये या मार्गावर शेकडो गाड्या कोळसा वाहून नेत आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे वारंवार अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. अरुंद रस्ते असल्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ करण्याची मागणी या भागातील नागरिकांची आहे. काही दिवसापूर्वी माथरा येथे एका बैलाला भरधाव ट्रकने चिरडले होते याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या मार्गावरील जड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्याची मागणी केलेली होती. भरधाव ट्रक वाहतुकीमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावा लागतो. धुळीचा त्रास प्रचंड होत आहे. रस्ते अरुंद आहेत. साठ-सत्तर टन घेऊन जाणारी वाहने या मार्गावर धावत असतात. त्यामुळे अतिशय धोकादायक स्थितीत या मार्गाची वाहतूक आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top