Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बेलोरा वर्धा नदीच्या पुलावरून लोखंडी सामान चोरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बेलोरा वर्धा नदीच्या पुलावरून लोखंडी सामान चोरी पोलीस भंगार चोरट्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात... पत्रकारांना माहिती न देण्याचे कारण गुलदस्त...
  • बेलोरा वर्धा नदीच्या पुलावरून लोखंडी सामान चोरी
  • पोलीस भंगार चोरट्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात...
  • पत्रकारांना माहिती न देण्याचे कारण गुलदस्त्यात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्गुस -
घुग्गुस पोलीस भंगार चोरट्यांना वाचवण्यच्या प्रयत्नात असून पत्रकारांना आरोपींची नाव न देता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच अटकेत असलेल्या आरोपींची चांगलीच खातीरदारी सुद्धा होत आहे.
बेलोरा वर्धा नदीच्या पुलावरून लोखंडी सामान चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना घुग्गुस पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. या प्रकरणी अटकेत असलेले काही आरोपी अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
घुघुस येथील बेलोरा वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. अशातच या पुलावरून लोखंडी साहित्य चोरी झाल्याचे सुपरवायझर जितेंद्र सिंग झाला यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी घुग्गुस पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत काही अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मात्र आरोपींची नाव व गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी काहीही माहिती दिली नाही. तसेच घुग्गुस पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही आहे ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच लहान मासळे पकळल्या जाते मोठे यांना अभय दान का? लोखंडी प्लेट साहित्य कुठे कुणाला विकल्या जाते याची पण चौकशी होने गरजचे असून मुक संमत्तीने मुकदर्शक बघ्याची भुमिका दिसून येते आहे. 
बेलोरा पुलाचे निर्माण कार्य शुरू असून चोरट्यांनी लोखंडी साहित्य सहा प्लेटा लंपास केल्याची खळबळ जनक बाब कळताच घुग्घुस पोलीसांनी काही अज्ञात संशयितांना अटक केली असून बेलोरा पुलाचे निर्माण कार्य मजूरांनी माहिती दिली भंगार माफिया चाकुचा धाक दाखवित भंगार साहित्य लंपास केले, पुलाच्या परिसरातून प्लेटा चोरुन नेले भंगार माफिया १५ च्या टोळीने सर्रास पणे मुजोरीने धुमाकूळ रात्रीच्या वेळी भंगार माफियांची टोळी सक्रिय असून मद्यंधुद करित चोऱ्या केला जात होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top