Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोळसा पेटत असलेल्या शेगडीवर पडून चिमुकली गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोळसा पेटत असलेल्या शेगडीवर पडून चिमुकली गंभीर जखमी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घूस - वॉर्ड क्र. २, चांद शाह वली दर्गा परिसरातील पाच ...
  • कोळसा पेटत असलेल्या शेगडीवर पडून चिमुकली गंभीर जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घूस -
वॉर्ड क्र. २, चांद शाह वली दर्गा परिसरातील पाच वर्षीय चिमुकली भांवडा सोबत खेळत असताना कोळसा पेटत असलेल्या शेगडी वर पडली. कोळश्याच्या विस्तवात चिमुकली जळून गंभीर जखमी झाली. याची माहिती घुग्घूस काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी व काँग्रेस नेते इर्शाद कुरेशी यांना होताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आर्थिक सहायता सुद्धा दिली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top