Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वर्धा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी चंद्रपूर / माजरी - मासे पकडण...
  • वर्धा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर / माजरी -
मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. १४ मे ला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास  उघडकीस आली. 
मिळालेल्या माहितीनुसार चार पुरुष व एक मुलगा असे पाच जण मासे पकडण्याकरीता शनिवारी सकाळी वर्धा नदीच्या पात्रात गेले होते. मासे पकडत असताना अशोक रामपाल यादव वय ४२ वर्षे व रोहित राहुल मल्लय वय ८ वर्ष दोघेही रा. एकता नगर माजरी यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या डोहामध्ये बुडाले त्यात दोघांची प्राणज्योत मावळली.
घटनेची माहिती माजरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध मोहीम राबविली यात अगोदर अशोकचा व नंतर रोहितचा मृत्यूदेह आढळून आला. पोलिसांनी मर्ग दाखल करून दोन्ही मृतदेह शव विच्छेदन करण्याकरीता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. पुढील तपास माजरीचे ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलिस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top