धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
राजुरा-गडचांदूर महामार्गावर चंदनवाही गावाजवळ आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान महामार्गावरील शेतातील एका झाडाचे बुड पेटवल्याने झाड अचानक रस्त्यावर पडले. सुदैवाने यावेळी रस्त्यावर एकही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. हे भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस आता अडथळा निर्माण होत असून या मार्गावरील वाहतूक खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने तात्काळ झाडाला बाजूला सारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.