Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ऑडिओ क्लिप व्हायरल करून शिवसेनेचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ऑडिओ क्लिप व्हायरल करून शिवसेनेचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चार महिन्यापासून सुरू होते आंदोलन डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - म...
  • ऑडिओ क्लिप व्हायरल करून शिवसेनेचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न
  • चार महिन्यापासून सुरू होते आंदोलन
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
मागील चार महिन्यापासून बिएस इस्पात कंपनी विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वात मजरा सालोरी येन्सा ब्लॉक मधील लोकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या प्रशासकीय स्तरावर सातत्याने बैठकी सुरू आहे परंतु अजून पर्यंत कोणताच मार्ग निघालेला नाही. यादरम्यान बिएस इस्पात कंपनी कडून जेठाणी यांच्यावर ठेका मागीतल्यासंदर्भात तसेच ग्रामपंचायत सदस्य हर्षल निब्रड यांच्यावर खंडणी व ठेका मागीतल्यासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे शिवसैनिक व गावकरी यांनी वरोरा शिवसेना कार्यालयात कंपनीचा निषेध करत कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मनिष जेठाणी यांनी कंपनीचे एच आर कातगळे, पत्रकार, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध मानहाणीची तक्रार वरोरा पोलिसात दाखल केली आहे.
या प्रकरणात गावकऱ्यांच्या रोजगार संबंधी काही मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याची दुरुस्ती, धुळीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, ग्रामपंचायतीचा अंदाजे 13 लाख रू थकीत कर, कंपनी सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतची लागणारी एनओसी, प्रदूषण विभागाच्या क्लिअरन्स सर्टिफिकेट, जे कर्मचारी काम करत आहे त्यांच्या पीएफ संदर्भातील प्रश्न, या सगळ्या बाबी वर कंपनी बोलायला तयार नाही. त्यामुळे या कंपनीमध्ये वारंवार गावकरी आंदोलना मार्फत आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु अजून पर्यंत कोणताही मार्ग प्रशासकीय स्तरावर निघालेल्या नाही. त्यामुळे हा वाद बऱ्याच दिवसापासून चिघळत आहे. तर दुसरीकडे कंपनीने दुसरे मजदूर आणून कंपनी सुरू करून स्थानिक रोजगारांना डावल्यामुळे हि स्थिती निर्माण करीत असल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात येत आहे. शिवसेना आणि कंपनी यांच्या वादात प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top