Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी यांना जलनगर वासियांच्या हितासाठी निवेदन सादर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी यांना जलनगर वासियांच्या हितासाठी निवेदन सादर शशी टक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर शहरात...
  • भाजपाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी यांना जलनगर वासियांच्या हितासाठी निवेदन सादर
शशी टक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील जलनगर वार्ड, उडिया मोहल्ला व सावरकर नगर येथील 49 नझुल घर धारकांना रेल्वे प्रशासन तर्फे नोटीस देण्यात आले आहे. हे 62 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे, हे चुकीचे असुन त्यासंदर्भात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी जलनगर वार्ड,उ डिया मोहल्ला व सावरकर नगर येथील भागाची मौका चौकशी करावी व अनेक वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या नझुल घर धारकांना स्थायी स्वरूपात जेथे सध्या स्थितीत निवास स्थान आहे तेथेच राहण्यासाठी कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री ब्रिजभूषन पाझारे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगर सचिव राकेश बोमनवार, रामकुमार आकापेल्लीवार, अमित निरंजने, मनीष खापरे, महेश झिटे, सत्यम गाणार, रमेश चित्तलवार, जुबेर शेख, बादल जैस्वाल, शुभम बुटले, बबन राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top