Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गॅस सिलेंडरच्या गळतीने आगीत जखमी झालेल्या पती-पत्नीचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गॅस सिलेंडरच्या गळतीने आगीत जखमी झालेल्या पती-पत्नीचा मृत्यू  डी.एस. ख्वाजा - विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी चंद्रपूर / घुग्घुस - घुग्घुस येथ...
  • गॅस सिलेंडरच्या गळतीने आगीत जखमी झालेल्या पती-पत्नीचा मृत्यू 
डी.एस. ख्वाजा - विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर / घुग्घुस -
घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा येथील वार्ड क्र ४ च्या परिसरातील सडवेली आसम यांच्या राहते घरातील सिलेंडरच्या गळतीने घराला आग लागली. आगीत घरात असलेले सडवेली आसम वय ५० वर्षे अनिता आसम वय ४५ वर्षे व रोहित आसम  वय २५ वर्षे, एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगा हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. एकाच कुटुंबातील गंभीर जखमी झालेल्या लोकांना जखमी अवस्थेत चंद्रपूर येथे हलविण्यात आहे होते. नंतर नागपूर मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने दोन दिवसापूर्वी पती सडवेली आसम यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. दोन दिवसा नंतर म्हणजेच आज शुक्रवार १३ मे रोजी सकाळी उपचारा दरम्यान पत्नी अनिता आसम हिचा ही मृत्यू झाला.  या दुर्दैवी घटनेत पती पत्नीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली पती पत्नीचा मृत्यूने नकोडा गावात शोककळा पसरली.
शुक्रवार २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नकोडा येथे झोपडपट्टी परिसरात राहणारे सडवेली आसम यांच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडरच्या गळती मुळे त्यांची पत्नी  स्वयंपाक बनवत असतांना अचानक सिलेंडरने पेट घेतला त्यामुळे घराला आग लागली घरातील साहित्य जळून खाक झाले होते. घराला आग लागताच घरातील आसम कुटुंबियांनी आरडाओरडा करणे सुरु केले आगीत घरातील पती, पत्नी व मुलगा हे तिघेही गंभीर जखमी झाले आरडा-ओरडा ऐकताच व घरातून आगीचा धूर निघू लागल्याने शेजारील नागरिकांनी आसम यांच्या घराकडे धाव घेतली व पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी व पोलिसांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली व सिलेंडरला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही त्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top