Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; तीन जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; तीन जखमी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घूस - चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस जवळच्या नकोडा गावात गॅस सिलेंडरच...
  • घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; तीन जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घूस -
चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस जवळच्या नकोडा गावात गॅस सिलेंडरचा स्फ़ोट झाला. या गॅस सिलेंडरच्या स्फ़ोटात एकाच कुटूंबातील तीन जण गंभीर जखमी झाले. नकोडा येथील माता मंदिर वॉर्ड क्रमांक 4 येथे राहणारे सडओली आसमपेल्ली  वय 40, अनिता सडोओली आसमपेली वय 38 व रोहित आसमपेल्ली वय 19 असे गॅस सिलेंडरच्या स्फ़ोटात जखमी झालेल्या ची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार इंडियन गॅस कंपनीचे आसमपेल्ली यांच्या कडे कार्ड असल्यामुळे त्यांनी गॅस सिलेंडरचा नंबर लावला होता. त्याप्रमाणे त्यांना आज गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देण्यात आली मात्र गॅस सिलेंडर लावत असताना सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन कुटूंबातील तिघेही जण जखमी झाले त्यांना ताबडतोब उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top