Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बरांज कोळसा खाणीतील कामगारांचे जलसमाधी आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बरांज कोळसा खाणीतील कामगारांचे जलसमाधी आंदोलन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भद्रावती - बंद असलेली केपीसीएल प्रणित इंटिग्रेटेड बरांज ओपन कास...

  • बरांज कोळसा खाणीतील कामगारांचे जलसमाधी आंदोलन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भद्रावती -
बंद असलेली केपीसीएल प्रणित इंटिग्रेटेड बरांज ओपन कास्ट माईन ही कोळसा खान परत सुरू झाल्यानंतर आयबीओसीएम कोळसा खान प्रशासनाने कामगारांना अलीकडच्या तारखेचे नियुक्तीपत्र दिले आहे. मात्र सन 2007 पासून एकाच कंपनीच्या मालकीची आहे व कामगार सुद्धा तेव्हापासून कार्यरत आहे. त्यामुळे कंगएअन्न देण्यात येत असलेलेे नवे नियुक्तीपत् कामगारांना अमान्य असल्याचे सांगून येथील कामगारांनी खाणीच्या खड्ड्यातील पाण्यात उतरून गुरुवार दि. 28 ला जलसमाधी आंदोलन करीत खाणीतील काम बंद केले. दरम्यान काही काळ कोळशाची व मातीची वाहतूक बंद होती. नवे देण्यात आलेले नियुक्तीपत्र अमान्य असल्याचे निवेदन यावेळी खान प्रशासनाला सादर करण्यात आले.
सदर कोळसा खान प्रशासनाने एसपीव्हीची स्थापना करून त्या लेटरहेड वर कामगारांना नव्याने नियुक्तपत्र दिले ते नियुक्तीपत्र घेण्यास कामगारांनी नकार दिला. हे सर्व सदर सदर कंपनी आपल्या फायद्यासाठी कामगारांचे नुकसान करीत असल्याचा आरोप यावेळी कामगारांनी केला. दरम्यान कंपनी प्रशासनाने कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु आमची मागणी मान्य केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असे एकूण 25 प्रकल्पग्रस्त प्रशिक्षित कामगारांनी रेटून धरले. कंपनी आंदोलन उधळून काढण्यासाठी पोलिसांना पाचारण केले होते. हे आंदोलन वृत्त लिहिपर्यंत सुरूच होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top