Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चोरीला उघडकीस आणने गुन्हा नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चोरीला उघडकीस आणने गुन्हा नाही  बारा कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करा अन्यथा तीव्र आंदोलन करु  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जि...
  • चोरीला उघडकीस आणने गुन्हा नाही 
  • बारा कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करा अन्यथा तीव्र आंदोलन करु 
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिला इशारा
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री हशन मुसरिफ, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सामाजिक न्याय उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, नगर सेवक दिपक जैस्वाल बलू दिक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात ACC चांदा सिमेंट कंपनी नकोडा/घुग्घुस कंपनीला निवेदन देण्यात आले.
ACC कंपनीतील न्यू पॅकिंग हाऊस येथील कार्यरत असलेले कामगार यांच्या 2011 पासून तर 2022 पर्यंत EPF अफरातफर करून भरलेला नाही ह्या EPF चोरीचे प्रकरण काही कामगारांने उघडकीस आणल्याने ACC कंपनी त्या कामगारांवर खुप मोठा अत्याचार करत आहे कंपनीची बदनामी केली म्हणून त्या कामगारांना दोन ते तीन महिन्यांपासून कामगारांना कामावर घेत नाही आहे कंपनीची चापलुसी पणा जो करेल तोच या कंपनी मध्ये काम करणार असे पुष्कर चौधरी व प्रफुल्ल पाटील HR यांच्या बोलण्यावरून दिसते कामगारांना हक्काचा पैसा या ACC कंपनीने चोरी केला व कामगार हे प्रकरण सर्वांन समोर उघडकीस केले तर हा काय गुन्हा नाही चोर चोरी करणार त्याला दंड नदेता दुसर्‍याला दंड हा कुठला न्याय नाही म्हणून त्या बारा कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर घुग्घुस च्या माध्यमातून ACC कंपनी च्या विरोधात तीव्र भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी दिला. यावेळी घुग्घुस शहर अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, महासचिव शरद पाईकराव, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष रितीक मडावी, उपाध्यक्ष आदित्य सिंह, अशोक आसमपल्लीवार, दत्ता वाघमारे, जगदीश मारबते उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top