Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अज्ञात भरधाव ट्रकने दोन म्हसींना चिरडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात भरधाव ट्रकने दोन म्हसींना चिरडले एका म्हसीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी राजुरा-गोवरी मार्गावर जनावरांचा अपघातात वाढ चिंतनीय काल...
  • अज्ञात भरधाव ट्रकने दोन म्हसींना चिरडले
  • एका म्हसीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी
  • राजुरा-गोवरी मार्गावर जनावरांचा अपघातात वाढ चिंतनीय
  • काल भरधाव ट्रकने बैलांना दिली होती धडक त्यात दोन बैल झाले होते गंभीर जखमी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
घराकडे म्हसींचा कळप येत असताना भरधाव ट्रकने दोन म्हसींना जबर धडक दिली. यात एका म्हसीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. राजुरा तालुक्यातील माथरा येथील शेतकरी रामदास सीताराम चहारे यांच्या मालकीच्या एका म्हसीचा जागीच मृत्यू झाला तर तुकाराम सीताराम चहारे यांची म्हस गंभीररीत्या जखमी झाली. यात दोनही भावांच्या म्हसींचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास माथरा गोवरी मार्गावर घडली.
राजुरा-गोवरी मार्गावर सकाळच्या सुमारास भरधाव ट्रकने दोन बैलांना धडक दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोवरीकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने दोन म्हसींना जबर धडक दिली. यात एका म्हसीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीररित्या जखमी झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. दोन्ही दुभती महागडी जनावरे असल्याने दूध विकून शेतकरी संसाराचा गाडा चालवीत होते मात्र अचानक दुभत्या जनावरांचा अपघात झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. राजुरा-गोवरी-पोवनी मार्गावर कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या मार्गावर अपघातात वाढ झाली आहे. याकडे सबंधित विभागाने लक्ष देऊन कोळसा वाहतुकीवर प्रतिबंध घालावा मागणी नागरिकांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top