Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अभिनेत्री केतकी चितळे व अँड. नितीन भावे यांचेवर गुन्हा दाखल करा - बेबीताई उईके
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अभिनेत्री केतकी चितळे व अँड. नितीन भावे यांचेवर गुन्हा दाखल करा - बेबीताई उईके चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी  डी.एस. ख्...
  • अभिनेत्री केतकी चितळे व अँड. नितीन भावे यांचेवर गुन्हा दाखल करा - बेबीताई उईके
  • चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी 
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जावून अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फेसबुक वर पोस्ट टाकलेली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातुन शरद पवार यांच्यावर मोठ्या प्रमणावर अपमान केला असल्याचे दिसून येत आहे. त्याबरोबर अजुन एका गोष्टीचे जास्त वाईट वाटतं पोस्ट टाकत असतांना सुरुवातीला "तुका म्हणे" म्हणून तुकाराम महाराजांचा सुद्धा अपमान केला आहे. सुरुवतीला हे वाक्य टाकून तिने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायाचे देखील या ठिकाणी तिने अपमान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
केतकी चितळे सारख्या माथेफिरू व्यक्तीनी भविष्यात अश्या प्रकारच्या गोष्टी करु नहे या करीता तिचे फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम सर्व अकाऊंट कायमस्वरूपी ब्लॉक करावे तिच्याविरोधात भारतीय दंडसंहिता नुसार गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी सबंधित पोलीस निरीक्षक रामनगर यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे केतकी चिथडे विरोधात कायदेशिर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, जिल्हा उपाध्यक्ष ज्योति रंगारी, जिल्हा सरचिटणीस पूजा सेरकी, जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस रश्मी झोटिंग, जिल्हा संघटक सरस्वती गावंडे, जिल्हा सहसचिव शोभा घरडे, जिल्हा संघटकसचिव नीलिमा नरवडे, जिल्हा सरचिटणीस निता मेश्राम, जिल्हा सचिव नंदा शेरकी, सुरेखा ठाकरे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top