Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलीने खान प्रभावित क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावे - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलीने खान प्रभावित क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावे - आमदार सुभाष धोटे आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - आमदार सुभाष धोटे यांन...
  • वेकोलीने खान प्रभावित क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावे - आमदार सुभाष धोटे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक सव्यसाची डे आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत इंटक आणि खाण प्रभावित परिसरातील नागरिकांना घेऊन वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयात बैठक बोलावून क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी वेकोलीने सकारात्मक योगदान द्यावे असे आवाहन केले. त्याच बरोबर धुळ प्रदुषण, विशेषतः कोल वाॅशरिज मुळे होणारे धुळ प्रदुषण, ओव्हरलोड व चोरटी कोळसा वाहतूक अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना वेकोली अधिकाऱ्यांना केल्या. 
यात प्रामुख्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सास्ती चेकपोस्ट ते सास्ती टी पॉईंटवरील अनाथ आश्रम शाळेच्या चौकापर्यंत रस्त्याला स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे, धोपडाळा ते सास्ती चेक पोस्ट पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे, सास्ती ओपन कास्ट ६६ के.व्ही. उपकेंद्र जवळील दर्ग्याला नागरिकांच्या मागणीनुसार दर्गाचे टिन, एंगल आणि रोप उपलब्ध करून देणे, सेवरेज क्षेत्रा जवळील खुल्या जागेवर वृक्षारोपण करणे, खाण प्रभावित गावांच्या मुलभूत विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर आमदार सुभाष धोटे यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक डे यांच्याशी चर्चा केली आणि वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून स्थानिक जनतेच्या हितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, प्लॅनिंग ऑफिसर जी. पुल्लय्या, एपीएम समिर बरला, कामगार नेते आर.आर. यादव, नागेश मेदर, एलियाज खान, विजय कनकाटे, अनंता एकडे, देवेंद्र कोलुरी, पंकज जुलमे, महाकाली राजम, हारून शेख, ब्रिजेस जंगिडवार, अबास अली, संतोष बडकेलवार, उमाशंकर वाडकू, इक्बाल भाई, गुलू शेख उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top