Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन ट्रकांची अमोरा-समोर धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन ट्रकांची अमोरा-समोर धडक चार तास वाहतूक खोळंबली आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सिंदेवाही - शहरातील स्मशान भूमी जवळ दोन ट्रकांची समोरा समो...
  • दोन ट्रकांची अमोरा-समोर धडक
  • चार तास वाहतूक खोळंबली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सिंदेवाही -
शहरातील स्मशान भूमी जवळ दोन ट्रकांची समोरा समोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना १५ मे रोजी सकाळी ६.१५ च्या दरम्यान घडली असून या अपघातामुळे पुलावरील वाहतूक चार तास ठप्प होती. घडलेल्या घटनेसंदर्भात सविस्तर वृत्त असे की, चंदपुर मार्गे जाणार टाटा कंपनी चा एम.एच. ३४ एबी २७२१ ट्रक व नागपुर मार्गे जाणार अशोक लिल्यांड कंपनी चा एम.एच. ३४ एबी ७९८८ ट्रक यांची समोरा समोर धडक बसल्याने अपघात झाला. हा अपघात ऐन स्मशान भूमी जवळील असलेल्या पुलावर घडल्याने वाहतुक ठप्प झालेली होती. अपघाताची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच सिंदेवाही पोलिसाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जमलेल्या लोकांच्या गर्दीला दूर करुन अपघातग्रस्त दोन्ही ट्रकच्या ड्रायव्हरला उपचाराकरिता रुग्णालयात पाठवले. अपघात ग्रस्त दोन्ही ट्रक ला दोन क्रेन व एक जेसीपी च्या मदतीने बाहेर काढून जवळपास ४ तासाच्या प्रयत्नानंतर हा मार्ग मोकळा करण्यात आला त्यामुळे ठप्प पडलेली वाहतुक सुरु झाली. अपघात इतका गंभीर होता की दोन्ही अपघात ग्रस्त ट्रकांची समोरील बाजू दबली गेली. यात दोन्ही ट्रक चे ड्रायव्हर जखमी झाले. त्यापैकी एकाला सिंदेवाही येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर दूसऱ्याला चंद्रपुर येथील सामान्य रूग्णाल्यात दाखल करण्यात आले असून सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top