Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिवतीत अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवतीत अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स जिवती - जिवती तालुक्यातील अनेक गावात आज सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाका ब...
  • जिवतीत अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती -
जिवती तालुक्यातील अनेक गावात आज सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाका बसला. अवकाळी वादळी वाऱ्यांसह अनेकाच्या घरावरील टिनपञे उडाली. मात्र जीवित हानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी तालुक्यातील नागरीकांकडून केली जात आहे. 
१५ मिनिटे चाललेल्या या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे नागरिक भयभीत झाले. या अवकाळी पावसामुळे अनेकांना बेघर केल्याचे चिञ निर्माण झाले आहे. टेकअर्जुनी येथील माधव तांबोले, मधुकर वारे, बाबु तांबुळे, महारुद्र मुळे, रामकृष्ण फड, उत्तम वारे, बालाजी वारे तर देवलागुडा येथील शंकर थावरू राठोड, वसंत शंकर राठोड, देविदास राठोड यांच्या छतावरील टिनपञे उडाल्याने घरातील साहित्याची नासाडी होऊन मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी झालेला अवकाळी व वादळी पावसाचे तांडव जिवती, देवलागुडा, टेकाअर्जुनी, लोलडोहसह तालुक्यातील बहूतांश गावाला बसल्याने अनेकांच्या शेतातील फळझाडे तुटून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे चिञ बघायला मिळत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top