Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जेष्ठ पत्रकार, सा. विदर्भ चण्डिकाचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश रामगुंडे यांचे निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जेष्ठ पत्रकार, सा. विदर्भ चण्डिकाचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश रामगुंडे यांचे निधन लोकांच्या हाकेला धावून जाणारा पत्रकार आमचा विदर्भ - ब्युरो रि...
  • जेष्ठ पत्रकार, सा. विदर्भ चण्डिकाचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश रामगुंडे यांचे निधन
  • लोकांच्या हाकेला धावून जाणारा पत्रकार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
पत्रकारिता क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या युवा पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारे जेष्ठ पत्रकार व विदर्भ चण्डिकाचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश काका रामगुंडे यांचे आज सोमवार दि. 16 मे 2022 रोजी क्राईस्ट हॉस्पिटल येथे पहाटे 4.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज सोमवार दुपारी 4 वाजता नंतर त्यांचे पार्थिवावर येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाईल. त्यांचे मागे पत्नी व दोन मुली व इतर असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा-चौरे ले आउट, तुकुम गुरुद्वाराच्या मागे, दुपारी 4 वाजताच्या दरम्यान निघेल. 
शब्द पाळणारा आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारा माणूस अशी सुरेश काकांची ओळख होती. बल्लारपुरातील दादाभाई पॉटरीज मध्ये ते कार्यरत असताना माझ्या बाबां मुळे माझी त्यांचेशी ओळख झाली होती. माझ्या जीवनात प्रिंटिंगचे कार्य असो कि पत्रकारिता त्यांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत सहकार्य केले. मी जेव्हा पोर्टल सुरू केलं तेव्हा त्यांनी मला सर्वात आधी त्यांनीच शुभेच्छा देत डिजिटल मीडियाचे कौतुकही केले. वेळेप्रसंगी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर स्व. सुरेश काकांना सद्गती प्रदान करो.
दीपक शर्मा 
संपादक 
https://www.aamchavidarbha.com

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top