Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कार आणि दुचाकीच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कार आणि दुचाकीच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू कोरपना तालुक्यातील सोनुर्ली जवळ अपघात राजूरात शोककळा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोर...
  • कार आणि दुचाकीच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू
  • कोरपना तालुक्यातील सोनुर्ली जवळ अपघात
  • राजूरात शोककळा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना -
तेलंगाणातील आदिलाबाद पर्यंत जाणारा राज्य महामार्ग अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका असलेल्या कोरपना परिसरात अपघातांचे प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरपना तालुक्यातील सोनुर्ली जवळ दिनांक 15 मे ला सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान एका कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत राजुरा येथील भावी प्राध्यापिका वनिता चिडे ह्यांचे घटनास्थळीच निधन झाले असुन त्यांचा भाऊ विठ्ठल गोरे रा. घोडपेठ ता. भद्रावती हे गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामकिसन चिडे हे पत्नी सौ. वनिता तसेच त्यांचे साळे विठ्ठल गोरे व त्यांची पत्नी असे चौघे जण दोन दुचाकीने तेलंगणा राज्यातील बेला येथे लग्नाला गेले होते. लग्नानंतर राजुरा येथे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टीएस २०/ ए ६८७२ क्रमांकाच्या कार ने आपल्या भावासोबत येत असलेल्या वनिता चिडे यांच्या एमएच ३४/सीबी ४३९२ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की वनिता चिडे ह्यांचा जागीच मृत्यु झाला तर त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला असुन विठ्ठल हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले मात्र परिस्थिती तणावाची असल्याने त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शविच्छेदनासाठी गडचांदुर येथे पाठविण्यात येऊन रात्रीच शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास कोरपणाचे पोलिस करीत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top