- आमदार रवि राणा यांच्या हस्तक्षेपाने कंपनीने काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे केले कबूल
चंद्रपूर -
मान इंजिनीरिंग कंपनी OCM नायगाव, बेलोरा उपक्षेत्र वणी या कंपनीने २०२० मध्ये कुठलेही कारण नसताना व कामगारांना कसल्याही प्रकारचे पूर्वसूचना पत्र न देता कामावरून काढले होते. त्यानंतर एकीकडे सततच्या लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे या ४ कामगारांकडे कमविण्याचे कुठलेही साधन नसल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांनी कंपनी प्रशासनाला परत कामावर घेण्याकरिता विनंती केली पण काही झाले नाही. अखेर या पाच कामगारांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना आपली व्यथा सांगताच सुरज ठाकरे यांनी या कामगारांना परत कामावर घेण्याकरिता संबंधित विभागांमध्ये व कंपनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून विनंती केली व तेवढ्यावरच न थांबता दिनांक १६ जुलै २०२१ रोजी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार रवि राणा व खासदार नवनीत रवी राणा यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विषयांसह चर्चा केली. त्या ४ कामगारांचा देखील विषय मांडला. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी या ४ कामगारांना परत कामावर घेण्याकरिता कंपनी प्रशासनाला विनंती करताच कंपनीने रवीभाऊ राणा यांच्या विनंतीचा मान ठेवत व कामगारांच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून कंपनी मालकाने परत काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे कबूल केले. यानंतर युवा स्वाभिमान पक्षाने व जय भवानी कामगार संघटनेने कंपनी मालकाचे देखील आभार मानले व भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही कामगारांवर अन्याय होऊ नये याकरिता कंपनी प्रशासनाला विनंती देखील केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.