Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चनाखा गावाचे १००% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यातील ठरले तिसरे गाव विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - कोविड १९ च्या प्रकोपाला दूर सारण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस अत्...
  • जिल्ह्यातील ठरले तिसरे गाव

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
कोविड १९ च्या प्रकोपाला दूर सारण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस अत्यावश्यक असल्याने, शासनाने गावागावात जनजागृती करुन युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली. सुरुवातीला अफवांवर विश्वास ठेवत लसीकरणास विरोध करणाऱ्यांनी सुद्धा जनजागृती मुळे लसीकरणास प्रतिसाद देत चनाखा येथे १००% लसिकरणाचे उद्दिष्ट आज दि. १७ जुलै २०२१ला पूर्ण केले. चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन व धिडसी पाठोपाठ १००% उद्दिष्ट पूर्ण करणारे चनाखा हे तिसरे गाव ठरले आहे. 
चनाखा गावाची एकूण लोकसंख्या १२१८ असून लस घेण्यास पात्र असलेल्या १८ ते ४४ या वयोगटातील ४२७ लोक आहेत या सगळ्यांचे लसीकरण झाले असून  वय ४४ वरील लोकसंख्या ५३८ आहे या सगळ्यांचे सुद्धा लसीकरण झाले असून १००% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
१००% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सरपंच सौ. रेखा आकनुरवार, उपसरपंच विकास देवाडकर यांचेसह ग्रां.प. सदस्य राजेश सातपुते, सुनिता सातपूते, प्रतिभा मडावी, प्रकाश दुर्योधन, ज्योत्सना वानखेडे, ग्रामसेविका मंजुषा पारखी, आशा वर्कर श्रद्धा पंचभाई, जि.प.उच्च प्राथ. शाळेंचे मुख्याध्यापक भास्कर वाटेकर, मधुकर सत्रे, दिवाकर येलमूले, संदीप कोंडेकर, कान्होबा लांजेकर यांनी व परिचारिका विद्या जेऊरकर व कु. गिरडकर यांनी मोलाचे सहकार्य केले. 
राजुरा पं.स. मध्ये जास्तीत जास्त लसीकरण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांच्या मार्गदर्शनात अधिकाधिक कँप लावून कर्मचाऱ्यांना जनजागृतीसाठी प्रवृत्त करण्याचे बहुमोल कार्य करण्यात येत आहे. संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांच्या व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या धडपडीने लसीकरणाने वेग धरला असून लवकरच आपल्या तालुक्याचेही लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्टय पूर्ण होवो असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. 

17 Jul 2021

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top