- जेष्ठ व गरजू वृद्धांच्या मदतीला जनसेवा प्रतिष्ठान सरसावले
सावली -
चंद्रपूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 75 गावामध्ये जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान च्या वतीने जेष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सावली तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या लोंढोली, हरांबा, कढोली उपरी, वाघोली, सोनापूर या 6 गावातील 243 गरजू व जेष्ठ नागरिकांना जनसेवा प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक रेशनकीटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश पा.गड्डमवार, पं.स. सदस्य गणपत कोठारे, जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव नितीन नाडलावार, ग्रा.प.लोंढोलीचे सरपंच प्रमोद खोबे, ग्रा.प.हरांबाचे सरपंच बोदलकर मॅडम, उपसरपंच प्रवीणभाऊ संतोषवार, कढोलीचे सरपंच किशोर कारडे, ग्रा.प. उपरी सरपंच सातपुते मॅडम, उपसरपंच आशीष मंनबतूनवार, ग्रा.प.वाघोलीचे सरपंच नितीन कारडे, ग्रा.वि.अ.ग्रा.प.वाघोली बुट्टीचे भडके सर, ग्रा.प.सोनापूरचे उपसरपंच मुकेश भुरसे, ग्रा.वि.अ ग्रा.प सोनापूरचे वेलादी सर,
जिल्हासमन्वयक डॉ.खुशबू मॅडम, हाय्यक जिल्हासमन्वयक प्रसाद सर, तालुका समन्वयक रुपेश किरमे तसेच सर्व 6 गावातील ग्रा.पं. सदस्य व गरजू व जेष्ठ वयोवृद्ध नागरिक उपस्थित होते.
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.