- दारू दुकानाच्या नाहरकतीसाठी न.प. ने बोलावली विशेष सभा
- दारूसाठी होत असलेली सत्ताधाऱ्यांची धडपड ही चिंतेची बाब
गडचांदूर -
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात राहणाऱ्या गडचांदूर नगरपरिषदेने मंगळवार 20 जुलै रोजी एक विशेष समिती सभेचे आयोजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर शहराच्या विकासाचा साठी गडचांदुर नगर परिषद एवढी कधीच गंभीर राहिली नव्हती मात्र 20 तारखेला तडकाफडकी बोलविण्यात आलेल्या या सभेत एकंदर पाच विषय घेण्यात आले असून त्यामध्ये एक देशी दारूचे दुकान हे गडचांदूर शहरात स्थलांतरित व्हावे, पाचवा मुद्दा म्हणजे गडचांदुर नगर परिषदेचे पदाधिकारी यांच्या अर्धांगिनीच्या नावाने असलेले वाईन बार अँड रेस्टारंट ला परवानगी देण्यासंदर्भात विषय घेण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नप पदाधिकाऱ्याचा नवीन दारू दुकानाचा परवान्याला ना हरकत देण्यासाठीच ही सभा बोलविण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. नपच्या सत्ताधारी, पदाधिकाऱ्यांनी फक्त वाईन बारलाच कळीचा मुद्दा बनविला कि काय अशी चर्चा शहरामध्ये सुरु आहे.
शहराच्या विकास कामावर आजपर्यंत नप एवढी गंभीर कधीच नव्हती फक्त दुकानांच्या नूतनीकरणासाठी व एनओसी साठी गडचांदूर न.प. ची धडपड ही अत्यंत केविलवाणी म्हणावी लागेल. वार्ड क्रमांक तीन मधील प्रभाग 4 मध्ये वाईन बार अँड रेस्टॉरंट ला नाहरकत मिळावी यासाठी या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वार्ड क्रमांक तीन मधील प्रभात चार मध्ये या नवीन बार बाबतचा नाहरकत व बाकी कागदपत्रे अपुरे असूनही या बारचा नाहरकतिच्या विषय या सभेत चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे 40 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरात 10 वाईन बार, 4 देशी दारूची दुकाने सद्यस्थितीत कार्यरत आहेत. असे असतानाही न.प. पदाधिकाऱ्यांचा दारू दुकानाला विशेष सभेत नाहरकत मिळावी यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. औद्योगिक नगरी असलेला गडचांदूर शहर बेरोजगारी व प्रदूषणाने माखलेला आहे. गडचांदूर शहराच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न कधीच केले नाही तेवढे आज दारू साठी होत असलेली सत्ताधाऱ्यांची धडपड ही चिंतेची बाब असल्याचे विरोधी पक्षाचे मत आहे
स्वताचे पत्नीचा नावाने बिअरबार व रेस्टारंट करीता व इतर ठिकाणाहून देशी दारू चा परवाना स्थलांतरण करीता नाहरकत प्रमाणपत्र नप ने विषेश सभा लावली असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. सिमेंट कंपनीचा मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण ला आळा घालण्याकरिता नागरीकांनी विषेश सभा लावण्याकरीता विनंती अर्ज करूनही सभा न लावणाऱ्या नपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र दारुच्या परवाना करीता अर्ज येताच विषेश सभा लावली. हीच आहे का यांची कर्तव्यदक्षता असा टोला विरोधकांनी लगावला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.