Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोशल मीडियावर मुलीची बदनामी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातून युवकाला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - बल्लारपूर शहरातील रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने आपल्या मुलीचे लग्न केले नाही, म्हणून गेल्या ...
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
बल्लारपूर शहरातील रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने आपल्या मुलीचे लग्न केले नाही, म्हणून गेल्या 15 वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीची बदनामी करणार्‍या विवाहित युवकाला बल्लारपूर पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या झांसी येथून अटक करत त्याला न्यायालयात हजर केले. कोर्टाने आरोपीला जामिनावर सोडले अशी माहिती मिळाली आहे. 
पीडितेच्या आईने बल्लारपूर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत सांगितले कि २००७ मध्ये उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील मौरानीपूर येथे राहणारा सुरेन्द्र प्रतापसिंग रघुवीरसिंग परिहार वय ४५ याचा संबंध आपल्या मुलीसाठी आला होता. परंतु त्याच्या खराब आचरणामुळे आणि व्यसनाधीनतेमुळे त्यांनी हे संबंध नाकारले होते. यानंतर, फेब्रुवारी २००९ मध्ये मुलीचे मुंबईतील एका तरूणाशी लग्न झाले, तिला एक मूल आहे. पण हे संबंध नाकारल्यानंतर सुरेंद्र प्रताप सिंह संतापला होता आणि त्याने फोनवर मुलीला त्रास देणे सुरू केले. २०१५ पासून त्याने बनावट अकाउंट बनवून मुलीची बदनामी सुरू केली. ज्याची खबर मुलीने मुंबई सायबर सेलला दिली होती. तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली व नंतर जामिनावर सोडले. हे प्रकरण अद्याप मुंबई न्यालयात प्रलंबित आहे. या घटनेनंतर सुरेंद्र काही दिवस ठीक होता, परंतु डिसेंबर २०१८ पासून फेसबुकच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूर मधील लोकांना मित्र बनवून अपमानास्पद, खोटी विधाने करण्यास सुरूवात केली. यामुळे निराश होऊन ५ सप्टेंबर २०१९ रोजी बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र कोरोनामुळे त्याला अटक होऊ शकली नव्हती. कोरोनाची लाट कमकुवत झाल्यावर बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील, पीएसआय अनिल चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिवतोडे यांनी आरोपीला 2 जुलै रोजी अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले. तेथून कोर्टाने त्याला जामिनावर सोडले आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top