Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा मध्ये पावसाचे पाणी दुकानांत, घरात घुसले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी  राजुरा - बुधवारी दुपार पासून लागलेल्या संततदार पावसाच्या झळीने एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे ...
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
राजुरा -
बुधवारी दुपार पासून लागलेल्या संततदार पावसाच्या झळीने एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तर दुसरीकडे खालान भागात राहणाऱ्या नागरिकांना नालीचे घाण पाणी दुकानांत, घरात घुसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान संततधार पावसाचे पाणी दुकानांत, घरात घुसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. शहरात प्रत्येक ठिकाणी नाली सफाई करण्यात आली मात्र गडचांदूर मार्गावरील कच्या नालीत दारूच्या रिकाम्या बाटल व कचरा अडकल्यामुळे नालीचे घाण पाणी खालान भागात असणाऱ्या दुकानात, मागील बाजूच्या घरात घुसले त्यामुळे नागरिकांत दाणादाण उडाली व त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 
शहर व परिसरात बुधवार दुपार पासून पाऊस पडत आहे. गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दुपारी बारा ते एकच्या दरम्यान सलग एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या अश्यातच गडचांदूर मार्गावरील कच्या नालीचे पाणी खालान भागातील दुकानात व घरामध्ये घुसले.
मिळालेल्या माहितीनुसार दि. २२ जुलै ला राजुरा सर्कल मध्ये 17.1mm तर विरूर स्टेशन सर्कल मध्ये 21.2mm सरासरी 19.15mm पावसाची नोंद घेण्यात आली

गडचांदूर मार्गावरील नागरिक ४० वर्षांपासून पक्या नालीच्या प्रतीक्षेत
राजुरा ते गडचांदूर व नंतर आदिलाबाद जाणारा हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागा कडे येत असल्याने मार्गाच्या बाजूला नालीचे बांधकाम करण्याचे कामही संबंधित विभागाचे आहे. मात्र साळवे यांचे घरापासून ते इंदिरा गांधी उर्दू शाळेपर्यंत या रस्त्यावर पक्की नाली नसल्यामुळे कच्ची छोटी नालीचे घाण पाणी दरवर्षी ज्या घरांची, दुकानांची उंची कमी आहे तिथे पाणी घुसत आहे. जास्त प्रमाणात पाऊस पडला तर नागरिकांच्या धाकधुकी वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या नालीचे पक्के बांधकाम करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top