Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सारंगपुर ते कापसी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - नेर तालुक्यातील सारंगपुर ते कापसी रस्ता अत्यंत खराब झाला आहे गेले कित्येक वर्षे या रस्त्याचे का...

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
नेर तालुक्यातील सारंगपुर ते कापसी रस्ता अत्यंत खराब झाला आहे गेले कित्येक वर्षे या रस्त्याचे काम झाले नाही. मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्ताच्या दोन्ही बाजूंना झाडे गवत वाढले आहे. त्यामुळे तेथुन येजा करताना कापसी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक गावकऱ्यांनी कापसी रस्त्यासाठी खुप प्रयत्न केले. परंतु काहीही झाले नाही रस्ताचा प्रश्न निकाली लागला नाही विशेष म्हणजे कोणीही या गोष्टी कडे लक्ष देत नाही. प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा या गोष्टी कडे लक्ष देणे टाळले आहे. नागरिकांनी त्वरित हा रास्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top